अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री करत असताना स्वतः ‘डॉक्टर’ असलेले राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे मात्र सर्व सूचना धाब्यावर बसवून लोकांच्या गर्दीत स्वतःची आमदारकी चमकविण्यात मग्न आहेत.
मंगळवारी त्यांच्या हस्ते तालुक्यातील मवेशी येथे पोलिस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला. सरकारने सर्व शाळा, महाविद्यालये बंंदच्या निर्णयाची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात येत आहे.
मात्र या निर्णयाकडे त्यांनी चक्क दुर्लक्ष केले. या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी व ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. आदिवासी समाजातील या मुलांना देशाची सेवा करत नोकरी उपलब्ध व्हावी, हाच मूळ उद्देश असल्याचे सांगत या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डाॅ. लहामटे यांनी केले.
बुधवारी सकाळी ८ पासून मतदारसंघात आ. डाॅ. लहामटे यांनी विविध विकासकामांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी ८ वाजता पहिला कार्यक्रम मवेशी आश्रमशाळा ते वैतागवाडी रस्ता सुधारणा उद्घाटन सोहळा आहे.
यानंतर प्रत्येक तासाच्या अंतराने इतर कार्यक्रम आयोजित केले आहेत. नो भूमिपूजन थेट उद्घाटन! : विकास कामे सुरू करताना प्रथम भूमिपूजन केले जाते. पण आमदार डाॅ. लहामटे यांच्या हस्ते भूमिपूजन न करता व काम प्रत्यक्षात पूर्ण न होता थेट उद्घाटन समारंभच आयोजित केले आहेत.
कोरोना रोखण्यासाठी कृती कार्यक्रम घेण्याऐवजी लोकांना एकत्रित करून उद्घाटनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार व्यस्त असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com