‘त्या’ जुगारी विश्वस्ताची हकालपट्टी

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News:जगद्तगुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमीतील देहू संस्थानचा विश्वस्त विशाल मोरे जुगार खेळताना पकडला गेल्याने त्याला अटक झाली होती.

आता संस्थानने त्याची हकालपट्टी केली असून त्याच्या जागी नाना मोरे यांची बनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी चाकण एमआयडीसी जवळील येलवाडी गावातील एका बंद कंपनीमध्ये जुगार खेळताना २६ जणांना पकडण्यात आले होते.

त्यामध्ये देहू संस्थाचे आजी-माजी विश्वस्त तसेच देहू नगरपंचायतीचे नगरसेवक आणि एका नगरसेविकेच्या पतीचा समावेश होता. विश्वस्त विशाल मोरे याला अटक झाल्यानंतर संस्थेच्या पदावरुन निलंबित करण्यात आले होते.

आता त्याची थेट हकालपट्टी करण्यात आली असून त्या जागी निवडणूक घेण्यात येत आहे. विश्वस्ताला जुगार खेळताना पकडले गेल्याने संस्थानचा नाचक्की झाली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe