अहमदनगर लाईव्ह24 टीम :- खानापूर परिसरात आदिवासी महिलेवर बलात्कार करून निर्घृण हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेला गर्दनी येथील तिसऱ्या आरोपीला पोलिसांना गुरुवारी जेरबंद केले. शिवराम खोडके (वय ४५) त्याचे नाव आहे.
यापूर्वी पोलिसांनी सोमनाथ गायकवाड (वय ३७, राहणार टाकळी) यास अटक केली आहे. या दोघांनी संगनमताने हे कृत्य केल्याचे तपासातून स्पष्ट झाले. संगमनेर येथील बाजारात आरोपीने विकायला नेलेला बोकड व अन्य सबळ पुरावे पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
खोडके हा पीडित महिलेच्या परिसरात राहत असून तो गायकवाड याचा मित्र आहे. पोलिसांनी प्रथम फोडसे या संशयितास ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून संदिग्ध माहिती मिळत होती. पोलिसांचा सोमनाथ गाडकवाड याच्यावर संशय होता.
मात्र, पुराव्यांची पुष्टी मिळत नव्हती. गायकवाड फरार असल्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते. पोलिसांनी गायकवाडला बेड्या ठोकल्या. पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलायला लागला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
हा गुन्हा करताना आपला साथीदार कोण होता, याची देखील कबुली दिली. आठवडाभरापासून अकोले पोलिस खोडकेच्या मागावर होते. अखेर आज पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. शिवरामला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता घटनाक्रम जुळता असल्याचे दिसून आले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com