अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या कारला आज नगरमध्ये अपघात झाला.
केडगाव बायपास चौकात त्यांच्या कारचा पुढील टायर फुटल्याने हा अपघात झाला.
परंतु चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याकडेला घेत नियंत्रण मिळवल्याने ते थोडक्यात बचावले.
नवाब मलिक हे आज सकाळी ते मुंबई येथून परभणीला आढावा बैठकीला जाण्यासाठी सरकारी वाहनातून नगरमार्गे जात होते.
सकाळी साडेदहाच्या सुमारास केडगाव बायपास रोडवर त्यांची कार आली होती. नील हॉटेलसमोर कारचे पुढील चाक फुटले.
चाक फुटल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडी डाव्या बाजूने घेत सुमारे तीनशे मीटर अंतरावर उभी केली.
याचवेळी चालकाने ब्रेक दाबले असते तर गाडी उलटण्याचा धोका होता. परंतु, चालकाने कार रस्त्याच्या कडेने उभी केल्याने संभाव्य धोका टळला.
कारमधील कुणालाही इजा झाली नसून ते लगेचच परभणीच्या दिशेने रवाना झाले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com