भारतात करोनाचा फैलाव झाला तर ‘इतक्या’ कोटी लोकांचा जीव जाईल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम / मुंबई :- करोना हे संकट अत्यंत गंभीर असून, यासाठी राज्यसरकारने लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय आवश्यकच आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कफ्र्यूच्या आवाहनाला जनतेने जोरदार प्रतिसाद दिला असला, तरी आज काही मूठभर लोक आपापल्या वाहनांनी फिरायला लागले.

विनाकारण फिरणाऱ्या या मूठभर लोकांना परिस्थितीचे गांभीर्य समजत नसेल तर शासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत केली.

केंद्र सरकारने परदेशातल्या विमानांना प्रवेशबंदी केली आहे. मात्र, आता नागरी विमानसेवाही बंद करण्याची गरज आहे. रविवारी जनता कफ्र्यूमध्ये फक्त आरोग्य आणि पोलीस यंत्रणा कार्यरत होती.

डॉक्टरांवर हात उचलणाऱ्या लोकांना आतातरी डॉक्टरांचे महत्त्व कळले असेल. आज ज्या पद्धतीने कोरोनाचा फैलाव होत आहे ते पाहता माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, की लोकांनी घराबाहेर पडू नये.

तुमच्या चुकांमुळे सर्वांना भोगावे लागू नये. चीन, अमेरिका, इटलीमध्ये काय परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर आपल्याला कोरोनाबद्दल सावधानता बाळगायला हवी.

भारतात त्याचा फैलाव झाला तर जवळजवळ ६० टक्के लोकांचा, म्हणजेच १३५ कोटींपैकी ८१ कोटींचा नाहक जीव जाईल आणि इतका फैलाव झाल्यावर त्याला आवरण्यासाठी पुरेशी यंत्रणा आपल्याकडे आहे का, असा सवालही त्यांनी केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment