Maharashtra News:अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिका प्रशासनाने अखेर स्वीकारला.
आज सकाळी त्यांना राजीनामा मंजूर केल्याचे पत्र देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार १३ ऑक्टोबरच्या दिवशीचे कामकाज संपल्यानंतर हा राजीनामा स्वीकारण्यात येत असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, यानंतरही आणखी काही तांत्रिक अडचणी उद्भवतात का, यावरही शिवसेनेकडून लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.