Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारभावाला लागली उतरती कळा! दिवाळी नंतर वाढणार का भाव? वाचा

soybean bajarbhav

Soybean Bajar Bhav : सोयाबीन हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक असून महाराष्ट्रात याची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. सध्या बाजारात नवीन सोयाबीन (New Soybean) विक्रीसाठी दाखल झाला असून सोयाबीन हंगाम आता सुरू झाला आहे.

मात्र नवीन सोयाबीन (Soybean Crop) बाजारात येताच व्यापार्‍यांनी सोयाबीनचे भाव हाणून पाडले आहेत. शेतकरी बांधवांच्या (Farmer) मते नवीन सोयाबीन ओला असल्याचे कारण पुढे करत व्यापारी सोयाबीनचे भाव (Soybean Rate) पाडत आहेत.

यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना (Soybean Grower Farmer) मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. खरं पाहता गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला उच्चांकी बाजार भाव (Soybean Price) मिळाला असल्याने या वर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, यावर्षी सोयाबीन पिकाला पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे.

मध्यंतरी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. यामुळे उत्पादनात घट होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी सध्या सोयाबीनला अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळत आहे. सध्या सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळतं आहे.

गेल्या महिन्यात सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव मिळत होता मात्र आता यामध्ये तब्बल हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना सोयाबीन बाजार भावात वाढ होण्याची आशा आहे. दिवाळीमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाल्यास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

सध्या परतीच्या पावसामुळे काढणीसाठी आलेल्या सोयाबीन पिकाला देखील याचा फटका बसत आहे. आधीच अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिक धोक्यात आले होते. आता परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनातं ज्यादा घट होणार असल्याचे शेतकरी नमूद करत आहेत. खरं पाहता गेल्या वर्षी सोयाबीनला मुहूर्ताला दहा हजार रुपये प्रतिक्विंटल ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव मिळतं होता. मात्र तद्नंतर सोयाबीन बाजार भावात घसरण झाली. हंगामाच्या शेवटी शेवटी सोयाबीन सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत स्थिरावला होता.

मात्र आता यावर्षी नवीन सोयाबीन बाजारात येताच व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे भाव हाणून पाडले आहेत. दरम्यान व्यापाऱ्यांच्या मते, नवीन सोयाबीन मध्ये अधिक ओलावा असल्याने नवीन सोयाबीनला कमी बाजार भाव मिळत आहे. जुन्या सोयाबीनला अजूनही पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर बाजार भाव मिळत आहे. तसेच पावसामध्ये सापडलेले सोयाबीनला तर अतिशय नगण्य बाजार भाव मिळत आहे.

दरम्यान यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबिनच्या उत्पादनात घट झाली असल्याने तसेच सोयाबीन पिकावर रोगराईचे प्रमाण अधिक असल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली असल्याने सध्या मिळत असलेल्या बाजारभावात उत्पादन खर्च काढणे मुश्कील आहे. व्यापाऱ्यांच्या मते, सध्या सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता नाही.

दिवाळीनंतर देशांतर्गत सोयाबीनचे किती उत्पादन झाले आहे हे समजेल आणि तद्नंतर सोयाबीनच्या बाजार भावाबाबत अजूनच स्पष्टता येणार आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी बाजारपेठेचा आढावा घेत सोयाबीनची विक्री करणे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe