होम कोरंटाईन असलेला रुग्ण बिनधास्तपणे अहमदनगरमध्ये फिरला,पोलिस करणार गुन्हा दाखल…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाराष्ट्रत गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आता राज्यातल्या करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १२६ वर पोहोचला आहे. देशभरात हे रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे.शासनाकडून नागरिकांना सक्तीने घरातच राहण्याचं आवाहन केलं जात आहे.

नगर शहरात मात्र हातावर होमकोरंटाइनचा शिक्का असलेला एक वृद्ध व्यक्ती गुरुवारी दुपारी फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सदर व्यक्ती नगरमधील राहणारा असून तो कुठे प्रवास करून आला याची माहिती आता घेण्यात येणार आहे.

सदर साठ वर्षाचा वृद्ध त्याच्या मुलाच्या मोटरसायकलवरून शहरातील सर्जेपुरा परिसरातून जात होता. यावेळी पेट्रोलिंगला असलेल्या पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा केली. तेव्हा त्याच्या हातावरती होमकोरटाईन असा शिक्का होता. यावेळी पोलिसांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयाला माहिती सांगितली.

रुग्णालयाच्या पथकाने येऊन सदर व्यक्तीस घेऊन गेले.सदर व्यक्तीच्या हातावर होम कोरनटाईन असा शिक्का असतानाही तो शहरात फिरून निष्काळजीपणा करीत असल्याने त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेऊन नागरिकांना वैद्यकीय पथकामार्फत घरी जाऊन शिक्का मारण्यात येत आहे.

शिक्का मारलेल्या नागरिकांना १४ दिवस घरातच विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय पथक नेहमी त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या प्रकृतीची तपासणी करणार आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment