अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाला विरोध केल्याच्या रागातून महिलेची हत्या करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस अटक !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  पारनेर तालुक्यातील बहुचर्चीत वडझीरे येथे गोळीबार व खुनातील मुख्य आरोपी  राहुल गोरख साबळे रा.रांधे ता.पारनेर जि.अहमदनगर याला आज सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

आरोपी राहुल साबळे याने सविता सुनिल गायकवाड (वय 35 वर्ष) रा.वडझीरे ता.पारनेर जि.अहमदनगर हिचा गोळया घालुन खुन केला होता.आरोपी दीड महिन्यापासून फरार होता. मुख्य आरोपी राहुल गोरख साबळे याला पालघर जिल्ह्यातील वाडा या ठिकाणाहून अटक करण्यात आलीय.

गेल्या दीड महिन्यापासून राहुल साबळे हा या खून प्रकरणात फरार होता. या घटनेतील मुख्य आरोपी सापडण्यात आला असून आता या घटनेचा उलगडा होणार आहे.

सध्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला असून पारनेर शहरासह तालुक्यातील इतर मुख्य गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पा

रनेर पोलीस ठाण्यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असतानाही पोलिस बंदोबस्त संभाळून या वडझिरे येथील घटनेतील मुख्य आरोपीला विभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक राजेश गवळी, पो.काॅ भालचंद्र दिवटे व सत्यजित शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.

गुन्हयाच्या तपासात असतांना मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री सागर पाटील सो, यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे आदेशा प्रमाणे सपोनि राजेश गवळी यांनी पारनेर पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन गोपनीय यंत्रणा सतर्क करुन व घटनेच्या अनुषंधाने मिळालेली गोपनीय माहीती संकलीत करुन

तपास पथकाला सतत आरोपीचे मागावर राहणे बाबत सुचना दिल्याने मिळालेल्या माहीती प्रमाणे आरोपी राहुल गोरख साबळे रा.रांधे ता.पारनेर जि.अहमदनगर हा किरवली,पोस्ट वरले ता.वाडा जि.पालघर येथे येणार असल्याची गुप्त बातमीदार मार्फत माहीती मिळाली 

त्यानंतर पथकातील अधिकारी कर्मचारी सपोनि/प्रमोद वाघ,पोकॉ/202 भालचंद्र दिवटे, पोकॉ/1782 सत्यजित शिंदे यांनी सापळा लावुन आरोपीचा पाठलाग करुन आरोपीतास शिताफीने ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment