Panjabrao Dakh : मित्रांनो सध्या राज्यात परतीचा पाऊस (Rain) बरसत आहे. ऑक्टोबर महिन्याचा सुरुवातीच्या तुलनेत पावसाचा (Monsoon) जोर कमी झाला असला तरी देखील काही ठिकाणी अजूनही जोरदार स्वरूपाचा पाऊस (Rain Alert) कोसळत आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होत आहे.
खरीप हंगामातील पिके सध्या काढणीच्या अवस्थेत आहेत अशा परिस्थितीत सध्या कोसळत असलेल्या पाऊस (Monsoon News) खरीप हंगामातील पिकांना मोठा घातक ठरत आहे. दरम्यान, मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. याशिवाय कोकणात देखील पावसाची हजेरी कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आज महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
तसेच आज मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या मराठवाड्यातील जिल्ह्यांत आणि बुलडाणा, वाशीम, यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता सार्वजनिक करण्यात आला आहे.
पंजाब रावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात आगामी काही दिवस पावसाची उघडीप राहणार आहे. आता राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र असे असले तरी स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यात 18 तारखे पासून थंडीला सुरुवात होणार आहे.
मात्र 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. हे दोन दिवस मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो असा पंजाब रावांचा अंदाज आहे. निश्चितच पंजाब रावांच्या या अंदाजामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शेतीची कामे करताना सोयीचे होणार आहे.