गंभीर परिस्थितीवर आक्रोशाची टाळी, तृतीय पंथीयांना कोणी देईल का भाजी पोळी ?

Ahmednagarlive24
Published:
file photo

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात लॉक डाऊन म्हणजेच संचारबंदी सदृश्य परिस्थिती लागू केली आहे. त्यामुळे अनेक शोषित-वंचित-दुर्लक्षित-उपेक्षित घटकांतील समुदायांवर उपासमारीची वेळ आली आहे.

त्यात तृतीयपंथी समुदायाचा देखील समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण १५० पेक्षा जास्त तृतीयपंथीसमुदाय आहे. समाजाने वाळीत टाकल्याने यांच्याकडे भीक मागून खाण्याशिवाय पर्याय नाही. देह पुरुषाचा परंतु आचरण संपूर्ण बायकांसारखे. त्यामुळे धड पुरुषात नाही आणि धड बायकांत अशी अवस्था तृतीयपंथीयांची असते.

स्त्रियांसारखे सजणे, पेहराव करणे, बोलणे आणि चालणे हे प्रकार आपसूकच परिस्थितीनुसार अंगवळणी पडतात. यामुळे रस्त्यावरून कधीही फिरतांना विचित्र नजरा आणि शिव्या या पलीकडे त्यांचा नशिबात काहीच नसते.

तृतीयपंथी कितीही शिकले तरीही त्यांना सन्मानाचा रोजगार अथवा काम मिळत नाही. परंतु समाजातील एखाद्या घरी मंगल कार्य असेल तर सर्वात प्रथम याच तृतीयपंथी समाजातील लोकांना बोलावून त्यांचा आशिर्वाद घेतला जातो. जेव्हा तृतीयपंथी भिक्षा मागतात तेव्हाच त्यांना पैसे मिळतात आणि त्या मिळालेल्या पैशातून ते आपली उपजीविका भागवतात.

परंतु आज त्यांना उपजीविका भागवण्यासाठी कोणतेही साधन नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील तृतीयपंथी समुदायाने आपल्या सामाजिक भावना जागृत ठेवत प्रत्येक राष्ट्रीय व नैसर्गिक आपतीत एक दिवसाची किंवा दोन दिवसाची संपूर्ण कमाई आपतीग्रस्त, देशबांधवांसाठी दिली आहे.

त्यात १९९३ सालचे मुंबई साखळी बॉम्बस्फोट, मराठवाडा व गुजरातचा भूकंप, ओरिसातील चक्रीवादळ, त्सुनामी, विदर्भातील आत्महत्या शेतकरी, कारगिलचे युद्ध, उत्तराखंडमधील भूस्सखलन, महाराष्ट्रातील दुष्काळ, तामिळनाडूतील महापूर, गावे पाणीदार होण्यासाठी पाणी फाउंडेशनला मदत अशा विविध नैसर्गिक आपत्तीत तृतीयपंथीयांनी सर्वप्रथम यथाशक्ती सहयोग दिला आहे.

पंतप्रधान निधी, मुख्यमंत्री निधी किंवा विविध वृत्तपत्रांचे सहाय्यता नीधी यातही तृतीयपंथीयांनी सहयोग दिल्याचे संघटक शीला गुरु यांनी सांगितले, परंतु तृतीयपंथी यांना आज मदत मागण्या शिवाय पर्यायच नाही आहे. तृतीयपंथी यांनी केलेली पुण्याई लक्षात घेत स्नेहालयच्या स्नेहज्योत प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी तृतीयपंथीयांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोरडा शिधा देण्याचे आवाहन “एक मदत, जगेल भारत” या अभिनव अभियानास सुरुवात केली आहे.

एका तृतीयपंथी किमान दहा दिवस जगेल असे जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करण्यात आले आहे. आपल्या ताटातील एक घास तृतीयपंथीयांना मदतीसाठी देण्यात यावा, असे आवाहन समस्त जनतेला या अभियानाचे प्रमुख प्रवीण मुत्याल आणि दीपक बूरम यांनी केली आहे.

समाजातील संवेदनशील नागरिकांनी या अभियानास भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. या अभियानांतर्गत अहंमदनगर मधील 30 पेक्षा जास्त तृतीयपंथीयांना कोरडा शिधा घरपोहोच देण्यात आला तसेच सामाजिक विलगीकरण याबाबत जाणीवजागृती करण्यात आले. हे अभियान आणखी पंधरा दिवस पुढे चालवायचे आहे त्यासाठी जास्तीजास्त देणगीची आवशक्यता आहे. यासाठी आपण पुढे दिलेल्या बँकेच्या डिटेल्स वर देणगी देऊ शकता.

NameSnehalaya, AhmednagarSnehalaya, Ahmednagar

 

Bank Name:State Bank of IndiaHDFC Bank

 

Branch name:MIDC Area, Nagapur ,AhmednagarMarket Yard Branch
Account Number :3595292699301811000053339

 

Name of Account (Cheque to be made in the name of):SnehalayaSnehalaya

 

9 digit MICR number:414002002414240002
Current/ savings account:Current accountSavings  account

 

SWIFT Code/ Remittance InstructionsSBININBB507 
 RTGS/IFSC Code:SBIN0006040HDFC0000181
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment