कारण प्रवरेचा पॅटर्नचं वेगळा आहे …

Ahmednagarlive24
Published:

जेव्हा जगातचं ‘कोरोना १९ ‘ मुळे आरोग्य सुविधांचे प्रश्न निर्माण होतात. जेव्हा सगळं जगचं धास्तावलेले असतं, जेव्हा आधुनिक मंदिरे समजली जाणारी खाजगी किंवा ट्रस्टची रुग्णालये रुग्ण सेवा कमी अधिक प्रमाणात देत नाही, तेव्हा एक उत्तर सकारात्मक पणे ग्रामीण भागात समोर दिसते ….ते म्हणजे ‘प्रवरा पॅटर्न‘ …

संकट जेव्हा अधिक गडद होतातं …तेव्हा झाडांनी मुळांच्या साह्याने मातीशी अधिक घट्ट जोडुन घ्यायचं असतं …हा पद्मश्री डाॅ विठ्ठलराव विखे पाटील यांनी घालुन दिलेला नियम. व ‘‘आपण कायमं कोणत्याही संकटाच्या वेळी आपल्या माणसां बरोबर उभे असले पाहिजे‘‘ हा पद्मभूषण डाॅ बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार घेऊन प्रवरेत आजही कार्य केले जाते.

कोरोनाच्या येणाऱ्या संकटाच्या संदर्भात माजी मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डाॅ. राजेंद्र विखे पाटील गावकऱ्यां सोबत उपाय योजना विषयी आढाव बैठक घेतात…आणि निर्णय होतो …फक्त सहा दिवसात ‘कोवीड १९‘ हे संसर्गजन्य आजारासाठीचे १०० खाटांचे गावाबाहेर नविन रुग्णालय उभे करण्याचा.

डाॅ राजेंद्र विखे पाटील यांच्या नेतृत्वात दिवस रात्र रुग्णालयाचे काम चालु होते…यासाेबत हे रुग्णालयसाठी लागणारे डाॅक्टर, नर्स, इतर सुविधा देणारा स्टाफ यांचे ट्रेनिक पण सुरु होते. त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधाची उभारणी केली जाते.

याच वेळी समाजतील घटकांना या रुग्णालयाच्या मदतीसाठी आवाहन केले जाते . त्याला ही मोठा प्रतिसाद मिळतो …एका दिवसात २० लाख रुपये उभे राहतात…हा मदतीचा ओघ असाचं सुर असतो…

रुग्णालयाचे आयसीयु व आयसोलेशन वार्ड सह १०० बेड कक्षाचे काम फक्त ४ दिवसात ७० टक्के पुर्ण होते ….कारण प्रवरेचा पॅटर्नचं वेगळा आहे . म्हणुनचं सहकार , शिक्षण, आरोग्य,कृषि व ग्रामविकास यात आज ही प्रवरा ‘पायोनियर‘ समजली जाते.

तहान लागल्यावर विहीर खोदण्यात पेक्षा ….येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी आधीचं येथे केली जाते . …हे ‘कोविड १९‘ रुग्णालय अकोले, संगमनेर, श्रीरामपुर , कोपरगाव, राहुरी, राहाता , शिर्डी ,नेवासा , सिन्नर व येवला येथील नागरिकांसाठी गरज पडली तर ‘लाईफ लाईन ‘ ठरु शकते …डाॅ राजेंद्र विखे पाटील आपण पुढाकार घेऊन सुरु केलेल्या या कार्याला आमच्या मनःपुर्वक शुभेच्छा …!

– सचिन गोरडे पाटील

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment