Soybean Bajar Bhav : सोयाबीन दराला ग्रहण ! आता सोयाबीनला नाफेडच तारणार ! पण नाफेड सोयाबीन खरेदी केव्हा करणार, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:

Soybean Bajar Bhav : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची खरीप हंगामात (Kharif Season) आपल्या महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र लागवड पाहायला मिळते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोयाबीनचा नवीन हंगाम (Soybean Season) सुरू झाला आहे.

मात्र हंगाम सुरू झाला आणि व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे बाजार भाव (Soybean Rate) हाणून पाडले. हंगामाच्या सुरुवातीलाच तब्बल एक हजार रुपयांची घसरण सोयाबीनच्या बाजार भावात (Soybean Market Price) नमूद करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत सापडले आहेत. खरं पाहता या वर्षी सोयाबीन ला केंद्र शासनाने 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव (Soybean MSP) लावून दिला आहे. मात्र आता सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी बाजार भाव मिळत आहे. आज देखील सोयाबीन बाजार भावात घसरण झाली असून सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव देऊळगाव राजा एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे. दरम्यान नाफेडची (Nafed) सोयाबीन खरेदी अद्याप सुरू झालेली नाही.

जाणकार लोकांच्या मते नाफेडची खरेदी सुरू झाली नसल्याने सोयाबीन बाजार भावात मोठी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे हंगाम सुरू झाला तरीदेखील नाफेड कडून अजूनही सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू केली गेलेली नाही. जाणकार लोकांच्या मते नाफेड खरेदीला सुरुवात करेल तेव्हा सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र अजून नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू झाले नसल्याने शेतकरी बांधवांना नाईलाजास्तव आपला सोयाबीन खासगी बाजारात विक्री करावा लागत आहे.

येत्या काही दिवसात दिवाळीला सुरुवात होणार असल्याने दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी बांधवांना पैशांची चणचण भासत असल्याने सोयाबीन विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अशा परिस्थितीत नाफेड सोयाबीन खरेदी केव्हा सुरु करेल याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागून आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, शासन केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी शेतकरी बांधवांना नोंदणी करणे आवश्यक असते. मात्र अद्याप नाफेड कडून शेतकरी बांधवांची नोंदणी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता नाफेड नोंदणी केव्हा करेल तसेच प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात केव्हा होईल हा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा राहिला आहे.

दरम्यान बाजारात दाखल होत असलेला नवीन सोयाबीन अधिक आद्रता असलेला आणि प्रतवारी उत्तम नसल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांकडून सोयाबीनचे भाव हाणून पाडले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. यामुळे नाफेडने लवकरात लवकर खरेदी सुरू करावी आणि व्यापाऱ्यांच्या या अमर्यादित व्यवहाराला अंकुश घालावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकऱ्यांच्या मते नाफेडकडून सोयाबीनचा हंगाम संपल्यावर खरेदी केली जाते. तोपर्यंत शेतकऱ्यांची सर्रास लूट बाजार समितीमध्ये होत असते. दरम्यान यावर्षी देखील आद्रता कमी झाल्यानंतर सोयाबीनची नाफेडच्या माध्यमातून खरेदी होणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. दरम्यान राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाने लावून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची खरेदी होत असताना देखील त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांकडून केले जात आहेत.

दरम्यान जाणकार लोकांच्या मते नाफेड द्वारा हमीभाव केंद्र सुरु करण्यासाठी अद्याप सूचना आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत यावर्षी नाफेडची खरेदी उशिरा सुरू होणार असल्याचे समजत आहे. मात्र, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आपला सोयाबीन कवडीमोल दरात विकावा लागत आहे. एकंदरीत नाफेडकडून सोयाबीन खरेदी सुरू झाल्यास सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता तज्ञ लोकांकडून वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe