अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दिवस पाळण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात श्रीरामपूर तालुका परमीट रुम अँड वाईन शॉप ओनर्स सोशल असोसिएशनने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली होती.

त्यावर पुन्हा झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांनी कोरडा दिवस पाळण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. असोसिएशनच्या याचिकेवर न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेऊन संबंधितांच्या निवेदनावर निर्णय घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी, न्यायालयात दाखल पिटीशन, यापूर्वी दिनांक ०३ एप्रिल रोजी निर्गमित केलेले कार्यालयाचे आदेश आणि कायदेशीर तरतुदी लक्षात घेऊन आदेश पारित केले आहेत. लोकसभा मतदान क्षेत्रामधील काही तालुके विभाजित होऊन त्या तालुक्यातील भाग दोन लोकसभा मतदारसंघात येतो.
निवडणूक होणाऱ्या क्षेत्राच्या लगतच्या क्षेत्रात कोरडे दिवस जाहीर न केल्यास अशा क्षेत्रांमधून निवडणूक असलेल्या क्षेत्रात मद्याची बेकायदेशीर वाहतूक होऊ शकते. या मद्याचा वापर मतदारांना प्रभावित करण्यासाठी होण्याची शक्यता आहे.
- अकरावीला प्रवेश घेणार आहात, मग महाराष्ट्रातील टॉप 10 कॉलेजेस कोणती आहेत ? जाणून घ्या
- कोल्हापूरच्या कारागिराने बनवली खिशात मावणारी अवघ्या २० ग्रॅम वजनाची जगातील एकमेव चप्पल
- खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही, कठोर कारवाई करण्याचा आमदार कर्डिले यांचा इशारा!
- महाराष्ट्रातील अद्भुत धबधबा ! उन्हाळ्यात सुद्धा वाहतो ‘हा’ धबधबा
- अहिल्यानगरमधील बसस्थानके बनलेत गुन्हेगारांचे अड्डे, महिलांच्या दागिने-पैश्यांची सतत चोरी, पोलिस मात्र बघ्याच्या भूमिकेत