अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मोजक्या व्यक्तींमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकायचा असेल, बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला.
राज्यात कोरोनाची वाढती संख्या ही चिंतेची बाब बनली आहेत. त्यातच घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला आहे. “इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा घ्यावा; कोरोना लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची खैर करणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.
जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे.
भाजी खरेदीसाठी उसळणारी गर्दी चिंताजनक आहे. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे, मात्र या गर्दीमुळे लॉकडाऊनचा उद्देशच धोक्यात आल्याचं अजित पवार म्हणाले.
बेजबाबदारपणानं वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही.जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरुच ठेवलं तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय करावे लागतील, असंही पवार म्हणाले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com