Ahmednagar SP : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे, अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी (District Superintendent of Police Ahmednagar) राकेश ओला (Rakesh Ola) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी त्यांनी श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.सध्या ते नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक म्हणून कार्यरत होते.

तसेच सध्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (Manoj Patil) यांच्या नियुक्ती संदर्भात स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.मनोज पाटील यांचा कालावधी पूर्ण झाला होता. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांत नगर जिल्ह्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त होत होती.
दरम्यान आज अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदी राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राकेश ओला सध्या अँटी कारप्शन विभागाचे एसपी म्हणून कार्यरत होते. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नियुक्ती संदर्भात स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.
पुन्हा अहमदनगर !
२०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले ओला सरळ सेवा भरतीने सहायक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. सप्टेंबर २०१४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली.
त्यावेळी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी टोळीने अहमदनगरसह संपूर्ण राज्यात हैदोस घातला होता. या टोळीचा त्यांनी छडा लावून टोळीचे कंबरडे मोडले होते.