पुणे, अहमदनगर, कोल्हापुर, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील नागरिक इकडे लक्ष द्या पुढील ३ ते ४ तासांत घराबाहेर….

Published on -

राज्यात मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. तर दुसरीकडं अहमदनगर, नाशिक, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात परतीचा पाऊस कोसळत आहे.

राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात शेतीचं तर नुकसान झालंच आहे पण नद्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे.

अहमदनगर शहरासह परिसरात झालेल्या जोरदार पावसाने सिना नदीला पूर आला असून नगर-कल्याण महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे. या पावसाळ्यात ३ वेळा सिना नदीला पुर आल्याने नगर कल्याण महामार्ग बंद करण्यात आला होता.

पहाटे ४ वाजल्यापासून नगर शहरात विजेच्या गडगडाटासह झाला. पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. अशात भारतीय हवामान विभागाने पुन्हा आज जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.

नगरमध्ये आतापर्यंत ५५० मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यात असणार्‍या महसूल मंडळांपैकी ६१ महसूल मंडळात मुसळधार पाऊस झाला. गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोयाबीन, कपाशी, ऊस, बाजरी, मका या खरीप पिकांसह चारा पिकांचे नुकसान केले.

शेतकऱ्यांचा सध्याचा खरीप पीक काढणी आणि रब्बी बीज रोवणीचा निर्णायक कालावधी आहे. दरम्यान, दूर अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या दापोली समोरील ते लक्षद्विपच्या पश्चिम किनारपट्टी दरम्यान असलेल्या पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाबाच्या पट्टा ह्या इतर बरोबर मुख्य प्रणालीमुळेच सध्या इतर राज्याबरोबर महाराष्ट्रातही पाऊस पडत आहे.

पुढील ३ ते ४ तासांत घराबाहेर पडताना खबरदारी

पुणे, अहमदनगर, कोल्हापुर, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ ३० ते ४० कि.मी. प्रतितास वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ३ ते ४ तासांत घराबाहेर पडताना खबरदारी घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News