तुमच्या ‘या’ सवयी कोरोनाचा संसर्ग वाढवू शकतात…वेळीच व्हा सावधान !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-जीवघेण्या कोरोना व्हायरसने भारतातही एन्ट्री घेतली असून लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. अशात तज्ज्ञांकडून लोकांना स्वच्छता ठेवण्याचा आणि विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी खूप सारी सावधगिरी आ पण बाळगत असलाे तरी काही सवयी वाईट असतात, त्या वाईट सवयी समजून घेतल्या पाहिजेत. ज्या कोरोनाचा संसर्ग वाढवू शकतात.

नखे कुरतडणे : नखे अगदी लहान ठेवा. हात धुताना नखेही चांगल्या प्रकारे धुवा. नखांमध्येही विषाणू राहू शकतात. विशेषत: लांब आणि नेलपॉलिश लावलेली नखे. वेबएमडीचे वैद्यकीय संपादक डॉ. नेहा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, नखे लांब असतील तर २० सेकंद हात धुणेही पुरेसे ठरत नाही.कोरोना विषाणूचा आकार जवळपास १२५ नॅनोमीटर आहे. या आकाराचा विषाणू नखांमध्ये एवढेच नव्हे तर नेल पॉलिशच्या फटींमध्येही राहू शकतो.

धुम्रपान :मद्यपानामुळे शरीराची राेगप्रतिकारक शक्ती कमी हाेते. अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फाॅर बायाेटेक्नाॅलाजी इन्फाॅर्मेशनचा एक अभ्यास अहवाल सांगताे की, अति मद्यपानामुळे न्यूमाेनियाची शक्यता बळावते. तसेच काेराेनचा संसर्ग वाढवण्यास आणि ताे गंभीर श्रेणीत पाेहाेचवण्याचे कारक ठरते.

पिंपल्स फोडणे: पिंपल्स फोडणे म्हणजे चेहऱ्याला हात लावणे. त्यामुळे विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते. नखे विषाणूचे वाहक ठरू शकतात, त्यामुळे त्यांनी पिंपल्स फोडणे ही जर तुमची सवय असेल तर ती टाळा.

केसांत हात फिरवणे: विषाणू काही मिनिटे ते काही तास केसांत राहू शकतात. हात फिरवल्यास तो केसांद्वारे हात आणि नंतर चेहऱ्यापर्यंत जाऊ शकतो. अशाच प्रकारे दाढीवरून हात फिरवणेही धोकादायक ठरू शकते. त्यामुळेच ब्रिटनच्या आरोग्य सेवेशी संबंधित पुरुषांना गुळगुळीत दाढी करण्याचा सल्ला दिला जात आहे.

कमी झोप घेणे : ६ ते ८ तास झोप आवश्यक आहे. आपला बेडटाइम बदला. कॅफीन, अल्कोहोल आणि झोपण्याआधी काही खाणे टाळा. झोपण्याआधी टीव्ही आणि मोबाइल पाहणे टाळा. लॉकडाउन किंवा क्वारेंटाइनमुळे लोकांच्या दिनचर्येवर वाईट परिणाम झाला आहे. सतत टीव्ही-मोबाइल आदी पाहणे आणि कोरोनाच्या चिंतेमुळे लोकांना निद्रानाशाचा विकार जडला आहे. कमी झोप झाल्यास रोग प्रतिकारक यंत्रणा कमकुवत होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment