पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी थोरातांनी आपली राजकीय क्षमता समजावून घ्यायला हवी !

Published on -

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात अलिकडच्या काळात ज़रा जास्तच बोलू लागले आहेत. पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी थोरातांनी आपली राजकीय क्षमता समजावून घ्यायला हवी, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी शुक्रवारी थोरातांचा समाचार घेतला.

देशापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील १३० कोटी जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मोदींच्या एका आवाहनाने संपूर्ण देशातील जनता घरात बसली आहे.

जनतेने मोदींना दिलेल्या प्रतिसादामुळे कोराेनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न विविध यंत्रणांनी सुरू केला आहे. देशातील जनता संकटाच्या काळात एकसंध राहाते, हे मोदींच्या आवाहनामुळे सिध्द झाले.

जनतेत संकटाचा सामना करण्याची स्फूर्ती निर्माण होण्यासाठी रविवारी दिवे लावा हा मंत्र मोदींनी दिला. मात्र, मंत्री थोरातांनी पंतप्रधान मोदींवर टीका करून राजकारण सुरू केले, अशी टीकाही गोंदकर यांनी केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe