अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पाथर्डी तालुक्यातील सोनोशी गावाचे ग्रामदैवत ब्रम्हनाथ महारांच्या मूर्तीच्या अंगावरील दोन ते अडीच तोळ्याचे सोन्याचे दागीने कानातील बाळ्या व गळ्यातील लॉकेट असा सुमारे एक लाख रुपयाचा ऐवज दोन चोरट्यांनी गुरुवारी रात्री चोरुन नेला.
मंदिरात व परीसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. सोनोशी गावात नदीच्या जवळच ब्रम्हनाथ महारांजाचे मंदिर आहे.
मंदिरात ब्रम्हनाथ महाराजांच्या मूर्तीच्या अंगावर घातलेले सोन्याचे दागीने चोरट्यांनी लोखंडीगेट तोडुन मंदिरात प्रवेश करुन चोरुन नेले.
दुचाकीवरुन आलेले दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. एकाने तोंडाला रुमाल बांधलेला आहे, तर दुसऱ्याचा चेहरा मात्र स्पष्ठ दिसतो आहे.
या अगोदर झालेल्या मंदिरातील चोरीच्या प्रकरणातही हेच चोरटे असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अज्ञात दोघांविरुद्ध पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com