संगमनेर :- नगर लोकसभा मतदारसंघात मला व्यक्तिद्वेषातून विरोध करण्यात आला. थोरातांनी मला का विरोध केला याचे उत्तर मागण्यासाठी मी संगमनेरमध्ये आलो आहे.
ज्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने बघितली अशी दोन्ही माणसे माझ्या पराभवासाठी नगरमध्ये तळ ठोकून बसली.

या सर्वांनी प्रयत्न केले, तरी निकाल काय लागेल हे सांगायची गरज नाही, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले.
साकूर येथे महायुतीचे उमेदवार सदाशिव लाेखंडे यांच्या प्रचारासाठी विखे यांनी सभा घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना टीकेचे लक्ष्य केले.
ते म्हणाले, आमच्या घरात वाद लावण्याचे प्रयत्न तुम्ही केले. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा. पदाच्या महत्त्वाकांक्षेपोटी उद्या तुमच्याही कुटुंबात कलह निर्माण झाला, तर आश्चर्य वाटू देऊ नका.
आमच्या सहकारी संस्थांवर कायम टीका केली जाते, परंतु बंद पडलेले सहकारी साखर आम्ही चालू केले, तेथील कामगार आणि शेतकऱ्यांना आधार दिला.
सहकार चळवळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला, यात तुम्हाला वाईट वाटण्याचे काय कारण?
राज्यात आघाडी सरकार असताना कवडीमोल भावाने सहकारी साखर कारखानदारी विक्रीला काढण्याचे धोरण राधाकृष्ण विखे यांनी हाणून पाडले.
त्यामुळेच आज साखर कारखाने टिकून राहिले. आमच्या संस्थांबद्दल बोलताना थोरातांनी त्यांच्या सहकारी संस्थांमध्ये किती सामान्य कार्यकर्त्यांना पदे दिलीत याचा जाब विचारण्याची तयारी जनतेने ठेवावी.
संगमनेर तालुक्याच्या विकासासंदर्भात मी २३ मेनंतर गावोगावी जाऊन लोकांना माहिती देईन. माहिती देईन असे विखे म्हणाले.
- IRB Infra Share Price: IRB इन्फ्रा देणार चांगले रिटर्न? नोट करा पुढील टार्गेट प्राईस आणि दिलेली रेटिंग
- Ashok Leyland Share Price: अशोक लेलँडचा शेअर आज बुलिश! तज्ञांचा खरेदीचा सल्ला…पहा सध्याची पोझिशन
- Tata Steel Share Price: टाटाचा ‘हा’ शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीजवळ! 5 वर्षात दिले 320.56% रिटर्न
- Jio Finance Share Price: NBFC च्या ‘या’ शेअरमध्ये 2.60 अंकांची तेजी! नोट करा पुढील टार्गेट प्राईस आणि रेटिंग
- BEL Share Price: डिफेन्स क्षेत्रातील ‘हा’ शेअर गुंतवणूकदारांना करणार मालामाल! 1 वर्षात 31.61% ची तेजी