Panjabrao Dakh : गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाचा (Rain) चांगलाच जोर पाहायला मिळाला. परतीच्या पावसामुळे (Monsoon) महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मोठा धक्का बसला आहे.
परतीच्या पावसामुळे (Monsoon News) काढण्यासाठी आलेल्या खरीप हंगामातील पिकांची राखरांगोळी झाली आहे. परतीचा पाऊस खरीप हंगामातील सोयाबीन तसेच कापूस आणि इतर पिकांसाठी घातक ठरला आहे.
यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून उत्पादनात घट होणार आहे. कापूस पिकाला देखील परतीच्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या नवीनतम हवामान अंदाजानुसार, आज पासून पावसाची उघडीप राहणार आहे.
राज्यात मान्सून माघारी फिरला असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आज राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. निश्चितच हवामान विभागाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आता हवामान कोरडे राहणार असल्याने शेती कामाला वेग येणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आता रब्बी हंगामातील पेरणी करण्यासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. पाऊस माघारी फिरला असल्याने आता राज्यात थंडीचा जोर वाढणार असून यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे.
दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज पासून राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे.
हवामान विभागाचा आणि पंजाब रावांचा (Panjabrao Dakh News) अंदाज यावेळी सारखाच पाहायला मिळत आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज पासून राज्यात कडक ऊन पडणार आहे.
शिवाय राज्यात आता थंडी चांगलीच बघायला मिळेल. यामुळे सहाजिकच शेती कामाला वेग येणार असून रब्बी हंगामातील पेरणीची कामे देखील आता जोमात सुरु होणार आहेत. पंजाबराव यांच्या मते शेतकरी बांधवांनी आता काढण्यासाठी आलेल्या सोयाबीन समवेतच इतर पिकांची काढणी करून घ्यावी.
हवामान कोरडे राहणार असल्याने आता खरीप हंगामातील हार्वेस्टिंग देखील वेगाने सुरू होणार आहे. दरम्यान परतीच्या पावसाने तसेच पावसाळी काळात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील सर्व प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली आहेत. यामुळे रब्बी हंगामात तसेच उन्हाळी हंगामात पाण्याचा ताण नसणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
सहाजिकच खरीप हंगामात पावसामुळे नुकसान झाले असले तरी देखील या पावसामुळे रब्बी हंगामात शेतकरी बांधवांना चांगला फायदा होणार आहे. खरीप हंगामातील नुकसान भरपाई काढण्यासाठी पावसाळी काळात कोसळलेल्या पावसाचा फायदा होणार आहे.
एकंदरीत आज पासून राज्यात पावसाची उघडीप राहणार असून थंडीचा जोर वाढणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे. दरम्यान 30 ऑक्टोबरच्या आसपास राज्यात पुन्हा एकदा पाऊस कोसळू शकतो मात्र त्याबाबत अजून स्पष्टता येणे बाकी असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.