अहमदनगर लाईव्ह24 टीम :- दिल्लीतील एम्समध्ये शुक्रवारी सायंकाळी एका कोरोनाबाधित मातेने सुदृढ बाळाला जन्म दिला. बाळाची प्रकृती सध्या तरी उत्तम आहे. कोरोनाबाधित महिलेच्या पोटी जन्माला आलेले हे दिल्लीतील पहिले बाळ असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
सद्य:स्थितीत बाळाची प्रकृती अतिशय चांगली आहे, असे डॉक्टर नीरजा भटला म्हणाल्या. आपल्या डॉक्टर पतीकडून या महिलेला गुरुवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. गर्भवती महिलेच्या एम्समध्ये काम करणाऱ्या डॉक्टर पतीला कोरोनाची बाधा झाली होती.
दरम्यान साध्या हे बाळ आईसोबत असून त्याला स्तनपान केले जात आहे. आतापर्यंत तरी स्तनपानाद्वारे बाळामध्ये कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे स्पष्ट झाले नाही.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com