अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी धर्मांधांच्या वागणुकीवर आसूड ओढला.
मुंबईजवळच्या वसईमध्ये मरकजचा हा कार्यक्रम होणार होता, पण महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना परवानगी न दिल्याने पुढचा अनर्थ टळला. त्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन करताना राज ठाकरे म्हणाले, पोलिसांवर हात टाकले जात आहेत, थुंकत आहेत.
वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. या सगळ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलले पाहिजे. या सगळ्यांना फोडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील मी हेच सांगितले असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
हा लॉकडाऊन गांभीर्याने घ्या, अशी मी हात जोडून जनतेला विनंती करतो. कारण लोकांनी शिस्त पाळली नाही तर लॉकडाऊनचा कालावधी वाढेल. त्याचे गंभीर परिणाम होतील.
उद्योगधंदे बंद पडतील, नोकऱ्या जातील, सरकारच्या तिजोरीवर त्याचा परिणाम होईल. आजच जर आपण शिस्त पाळली नाही तर उद्या मोठ्या आर्थिक संकटाला आपल्याला तोंड द्यावे लागेल, असेही राज ठाकरे म्हणाले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com