अहमदनगर लाईव्ह24 टीम :- लॉकडाऊन काळात उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत २ कोटी ८२ लाख रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्यात एकूण १२२१ गुन्हे नोंद करण्यात आले असून, ३६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
यात ४७२ आरोपींना अटकही करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे. शेजारील राज्यांमधून महाराष्ट्रात होणारी अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी विभाग २४ तास कार्यरत आहे.
त्यानुसार नाकाबंदी केली असून गोवा, दादरा- नगर हवेली, दीव- दमण, कर्नाटक व मध्य प्रदेश राज्यांतून अवैध मद्य येणार नाही, याकरिता १२ कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी तपासणी करीत आहेत.
तसेच १८ तात्पुरते सीमा तपासणी नाकेदेखील उभारण्यात आले आहेत. अवैध मद्यनिर्मिती वाहतूक, विक्रीविरुद्ध तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात.
तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. त्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३ यावर अवैध दारूविरुद्ध तक्रार नोंदविण्यात यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आलेय.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com