सावधान! घराबाहेर पडू नका. कोरोना घोंगावतोय’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  संगमनेर : सध्या कोरोनाने जगभरात चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन सर्वांची काळजी घेत आहे.

मात्र, तरीही लोक बेजबाबदारपणे वागत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे ‘सावधान! घराबाहेर पडू नका. कोरोना घोंगावतोय’, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

सध्या राज्यात कोरोनाची संख्या वाढत चालली असून, ही देशाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. नगर जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढली असून, संगमनेरातही कोरोनाचे चार रुग्ण सापडले आहे.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून पोलीस, आरोग्य, महसूल याचबरोबर विविध सामाजिक संस्थांचे सदस्य नागरिकांची काळजी घेत आहे.

मात्र, तरीही काही लोक कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाने वारंवार सांगूनही लोक ऐकत नाही. कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे.

त्यामुळे संगमनेर शहरासह ग्रामीण भागातही तीन दिवसांसाठी शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे ‘सावधान! घराबाहेर पडू नका. कोरोना घोंगावतोय’, अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment