शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीस अटक

Ahmednagarlive24
Published:

अकोले :- तालुक्यातील जामगाव येथील वाल्मिक शिवाजी आरोटे (३६) या तरुण शेतकऱ्याने २३ एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 

या घटनेनंतर राजूर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांना मृताकडे एक चिठ्ठी मिळून आली होती. यातील मजकुरावरून एक आरोपी विलास दादाजी गोसावी यास अटक केली.

त्याला न्यायालयानेसहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील आरोपी धुतडोकार दाजी, विनायक चोथवे, संतोष मुतडक व प्रा. बादशहा नारायण ताजणे यासह अन्य आरोपी फरार आहेत. 

पोलिसांनी मृत शेतकऱ्याजवळल मिळालेल्या चिठ्ठीतील मजकूराबाबत मृताचे नातेवाईकांना अंधारात ठेवून अकस्मात मृत्यूची नोंद केली. 

या घटनेला आता पाच दिवस उलटल्यावर मृताच्या भावजय व नातेवाईकांनी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला.

त्यांनी या घटनेतील मृत शेतकरी आरोटे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींची नावे पोलिसांना दिली.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment