अहमदनगर :- अधिकाऱ्यांना बूट फेकून मारण्यात काहीच शूरपणा नाही. त्याऐवजी आपणच पिढ्यानपिढ्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना बूट फेकून मारून विकासाचा जाब विचारण्याचे धाडस नागरिकांनी करावे,’ असा सल्ला जागरूक नागरिक मंचाने दिला.
महापालिकेत बोल्हेगाव रस्ता कामावरून झालेल्या आंदोलनात महापालिका अधिकाऱ्यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याच्या घटनेचा निषेध जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे व अन्य सदस्यांनी केला,तो करताना त्यांनी अधिकाऱ्यांवर नव्हे तर लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना बूट फेकून मारण्याचा दिलेला सल्ला चर्चेचा झाला आहे.
‘नगरमधील अहिंसक व अतिसहनशील निष्क्रीय नागरिकांना यानिमित्ताने आवाहन केले जात आहे की, आपणच पैसे घेऊन निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना बूट फेकून असा जाब विचारला जावा. असे धाडस करण्याचे नगरकरांनी ठरवले तर शहरातील चपलांची दुकानेही पुरणार नाहीत.
वर्षानुवर्षे असणारे खड्डेयुक्त रस्ते, त्यावरून वाहणारे गटारीचे पाणी, सीनेवरच्या पुलाचे रखडलेले काम, चौका-चौकांतील बंद सिग्नल्स, शहरातील अरुंद रस्ते व त्यावरील अतिक्रमणे असे शहराचे प्रश्न न सोडवणाऱ्या लोकप्रतिनिधी व नगरसेवकांवर कोणी बूट फेकून मारला तर त्याचा जाहीर सत्कार जागरूक नागरिक मंच करील,’ असेही मुळेंनी यात स्पष्ट केले आहे.
- उन्हाळी हंगामात मक्याची लागवड करणार आहात का? मग या पाच जातींची निवड करा!
- आयसीआयसीआय बँकेकडून 10 लाखाचे पर्सनल लोन घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार? पहा…
- तुरीचे बाजार भाव 12 हजारावरून 7 हजारावर, भविष्यात कसे राहणार दर ?
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अहिल्यानगर, नाशिकसह ‘या’ भागात लागवडीसाठी उपयुक्त कांद्याचा नवीन वाण विकसित
- शेअर बाजारात मंदी राहिली तरी ‘हे’ 3 शेअर गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार!