Panjabrao Dakh : पंजाबरावांचा नोव्हेंबर महिन्यातला हवामान अंदाज ! हवामानात मोठा बदल ; ‘या’ तारखेला पावसाचं वातावरण

Published on -

Panjabrao Dakh : राज्यातून मान्सून (Monsoon) माघारी फिरला आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून माघारी फिरला असून आता राज्यात थंडीचा जोर वाढणार असल्याचे सांगितलं आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला असून राज्यात रब्बी हंगामातील कामांना वेग येणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की खरीप हंगामातील पिकांची काढणी प्रगतीपथावर आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मका तसेच सोयाबीन पिकाची काढणी जोमात सुरू असून येत्या रब्बी हंगामासाठी पैशांची उभारणी करणे हेतू शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची मळणी करून ताबडतोब बाजारपेठेत विक्रीसाठी नेत आहेत. दरम्यान राज्यात पावसाची उघडी बसल्याने शेतकऱ्यांना शेती कामे करताना सोयीचे होत आहे.

आता आपल्या हवामान अंदाज यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चीर परिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज सार्वजनिक झाला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नोव्हेंबर महिन्यातील सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात पावसाची पुढील पाच दिवस उघडीप राहणार आहे. मात्र दोन आणि तीन नोव्हेंबर रोजी राज्यात ढगाळ वातावरण बनणार आहे.

निश्चितच ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे मात्र त्या कालावधीत पाऊस होणार नसल्याचे पंजाबराव यांचे म्हणणे आहे. एकंदरीत आता राज्यात पावसाची शक्यता नाही. दरम्यान पंजाबराव डख यांनी शेतकरी बांधवांना सल्ला देत रब्बी हंगामातील पेरणीसाठी तयारी सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

पंजाबराव यांच्या मते शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील मुख्य पीक अर्थातच गव्हाची पेरणी सुरू करावी तसेच हरभरा पिकाची देखील पेरणी सुरू केली पाहिजे. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत हरभरा पिकाची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच दर्जेदार उत्पादन मिळणार आहे.

पंजाबराव डख यांच्या मते, या कालावधीत हरभरा पिकाची पेरणी केल्यास उतारा अधिक मिळतो. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. राज्यात सध्या पावसाची उघडीप आहे आणि हवामान कोरडा राहणार आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्रीत थंडीत देखील वाढ होणार आहे. यामुळे साहजिकच रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे चित्र आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News