Soybean Bajarbhav : महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव सहा हजारावर ! सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ; वाचा आजचे बाजारभाव

Ajay Patil
Published:

Soybean Bajarbhav : दिवाळीनंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी प्रथमच एक आनंदाची आणि अतिशय गोड बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला उचांकी  बाजार भाव मिळाला होता. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत. यावर्षी एक ऑक्टोबर रोजी सोयाबीनचा हंगाम सुरू झाला मात्र तेव्हापासून ते आत्तापर्यंत सोयाबीन पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावला आहे.

गेल्यावर्षी सोयाबीनला संपूर्ण हंगामभर सहा हजार रुपये प्रति क्विंटल ते सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत होता. एवढेच नाही तर सोयाबीन हंगाम सुरू झाला त्यावेळी गेल्या वर्षी सोयाबीनला तब्बल 11 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत होता.

मात्र त्यानंतर केंद्र शासनाने सोयाबीन आयातीला परवानगी दिल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात घसरन झाली होती. मात्र असे असले तरी गेल्यावर्षी हंगामाच्या शेवटी देखील सोयाबीन बाजार भाव 6,000 प्रतिक्विंटलच्या आसपास राहिले होते. मात्र यावर्षी सोयाबीन हंगाम सुरू होऊन तब्बल एक महिना उलटला तरीदेखील सोयाबीनला अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते यावर्षी सोयाबीनचा नवीन हंगाम सुरू झाला आणि व्यापाऱ्यांनी नवीन सोयाबीन मध्ये आद्रता अधिक असल्याचे कारण पुढे करत सोयाबीन बाजार भाव हाणून पाडले आहेत. मात्र असे असले तरी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

आज राज्यातील सोयाबीनच्या लिलावासाठी प्रसिद्ध असलेली अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5701 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला असल्याने आगामी काळात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होणार अशी आशा शेतकऱ्यांना आहे. निश्चितच सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाल्यास सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोज सोयाबीन बाजारभावाची माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाची विस्तृत पण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/10/2022
औरंगाबादक्विंटल370305050254037
हिंगोलीलोकलक्विंटल1100459953704984
परांडानं. १क्विंटल7485050004850
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल848250152315051
अकोलापिवळाक्विंटल3127372057014800
यवतमाळपिवळाक्विंटल1133440052004800
चिखलीपिवळाक्विंटल1030425052004725
बीडपिवळाक्विंटल563350051504731
वाशीमपिवळाक्विंटल6000460053015000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1500455052004950
पैठणपिवळाक्विंटल35330049004650
कळमनूरीपिवळाक्विंटल50500050005000
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल924400050004500
जिंतूरपिवळाक्विंटल318440052015015
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल7400425051354755
परतूरपिवळाक्विंटल829390051005050
गंगाखेडपिवळाक्विंटल15500052005100
देउळगाव राजापिवळाक्विंटल235350050004500
मंठापिवळाक्विंटल217440051504800
औराद शहाजानीपिवळाक्विंटल344445051804815
मुरुमपिवळाक्विंटल654430051734736
उमरगापिवळाक्विंटल161430049504911
पांढरकवडापिवळाक्विंटल100480050004900
कोर्पनापिवळाक्विंटल60430045004400
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल90448549004650
सोनपेठपिवळाक्विंटल408435152234870
देवणीपिवळाक्विंटल86480055265163

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe