अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले : मुंबईहून आलेल्या व होम क्वरंटाईनचा शिक्का मारलेला असताना देखील कळसचे बस स्टॅण्ड व रोडवर विनाकारण फिरताना येथील दोघांना ग्रामविकास अधिकारी समजावून सांगत असता शिवीगाळ केल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कळस येथील ग्रामविकास अधिकारी कचरू पुंजाजी भोर यांनी याबाबत अकोले पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून यात म्हटले आहे की,
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणू (कोव्हीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेशानुसार लॅाकडाऊन सुरू असताना व समज दिलेली असतानाही मुंबई येथून आलेल्या दोन व्यक्ती ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का मारलेला होता
ते दि. ३ व ४ एप्रिल रोजी कळसचे बस स्टॅण्ड व रोडवर विनाकारण फिरताना मिळून आले. त्यांना समजावून सांगण्यास गेलो असता त्यांनी शिवीगाळ केली. महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या सरकारी आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे फिर्यादीवरुन अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com