अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती चिंताजनक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीरामपूर तालुक्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. 

शेजारच्या गावातील डॉक्टरांनी या रुग्णाची तपासणी केल्याने डॉक्टरांसह त्यांचे संपूर्ण कुटुंब तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 14 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

सोमवारी पुणे येथील ससून रुग्णालयात तपासणी झाल्यावर या रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. 

तत्पूर्वी या रुग्णाला लोणी येथील प्रवरा रुग्णालय तसेच नगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. 

या रुग्णाला अशक्तपणा आला होता. शेजारील गावातील डॉक्टरांकडून रुग्णाने औषधोपचार घेतले होते. 

मंगळवारी आरोग्य विभागाने या गावांमध्ये प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांचे चार पथक तैनात केले. 

तेथे संपूर्ण ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली जात आहे. सर्दी, खोकला व ताप असणाऱ्या प्रत्येक नागरिकावर  बारीक नजर ठेवली जात आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment