Soybean Bajarbhav : देशात गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. यामुळे सध्या सोयाबीन हार्वेस्टिंगला वेग आला आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे की ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस कोसळत होता. यामुळे खरीप हंगामातील सर्वच मुख्य पिकांना मोठा फटका बसला होता.
सोयाबीन पीक देखील अंतिम टप्प्यात होते आणि अशा अवस्थेत सोयाबीन पिकाला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे सोयाबीनचा दर्जा खालावला आहे. सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव सोयाबीन काढणी करून विक्रीसाठी धावपळ करत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव सोयाबीनची शेताच्या बांधावरच विक्री करत असल्याचे चित्र आहे.
खरं पाहता पावसात सापडल्यामुळे सोयाबीनची टिकवण क्षमता कमी झाली आहे. यामुळे असा सोयाबीन अधिक काळ साठवता येणार नाही. यामुळे सध्या शेतकरी बांधव सोयाबीनची काढणी झाल्यानंतर ताबडतोब विक्री करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान खेडा पद्धतीने मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्री होत असल्याने शेतकरी बांधवांना बाजारपेठेपेक्षा कमी बाजारभाव मिळत आहे.
खरं पाहता सध्या बांधावर विकल्या जाणाऱ्या सोयाबीनला चार हजार तीनशे ते चार हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव (Soybean Rate) मिळत आहे. दरम्यान व्यापारी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात दाखल होणारा सोयाबीन पावसात सापडलेला आणि ओलावा अधिक असलेला असल्याने सोयाबीनला कमी बाजार भाव मिळत आहे.
बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा झाली आहे. काल सोयाबीनच्या बाजारभावात 50 ते 100 रुपये प्रति क्विंटरपर्यंत वाढ झाली आहे. सध्या सोयाबीनला 5000 ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे.
जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी 5000 रुपये प्रति क्विंटल ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजारभाव लक्षात घेऊन सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.
व्यापारी लोकांनी देखील शेतकरी बांधवांना सोयाबीन वाळवून बाजारपेठेत विक्रीसाठी आणावे असे आवाहन केले आहे. व्यापारी लोकांच्या मते सोयाबीनमध्ये अधिक ओलावा असल्याने सध्या सोयाबीनला कमी बाजारभाव मिळत आहे.