अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मंगळवारी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यासाठी श्रीरामपुरहून आलेले दोघे कोरोना संशयीत केस पेपर काढून ऐनवेळी बहाणा करत गायब झाले.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्रपणे कोरोना कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
त्या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांच्या घशातील स्त्राव काढून तो तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत पाठविण्यात येतो.
या ठिकाणी मंगळवारी श्रीरामपूरचे दोघे कोरोना संशयीत आले होते. त्यांनी कोरोनाची तपासणी करावयाची सांगत त्यासाठी केसपेपर काढला.
मात्र, ऐनवेळी उपस्थित डॉक्टरांना वडिल घेऊन येतो, असा बहाणा करत जिल्हा रुग्णालयातून काढता पाय घेतला.
कोरोनाची तपासणी करण्यासाठी आलेले अचानक गायब झाल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासन देखील आवक झाले. ते दोघे कोठे आहेत, याची शोधा शोध झाली.
मात्र, त्यानंतर ते मिळून आले नाहीत. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची नोंद देण्यात आली आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com