जितेंद्र आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी  केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील एका व्यक्तीने केली आहे.

एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे ही अतिशय गंभीर घटना आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे. सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही.

न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे.

पण शासनकर्तेच मारहाण करत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment