अहमदनगर :- मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर भाजप शहर जिल्ह्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे, असे खासदार गांधी म्हणाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या व भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या मोठे यश मिळाले आहे.

File Photo
अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून देण्यात आले होते. त्यामुळे अखेर अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. आता देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या दहशतवाद्यांची गय केली जाणार नाही.
- GST On Gold: 1 लाखाचे सोने खरेदी कराल तर किती द्यावा लागणार जीएसटी? बघा फायद्याची माहिती
- Onion Rate: आता सरकारच्या माध्यमातून ग्राहकांना मिळेल 5 ते 10 रुपयांनी स्वस्त कांदा! कसे ते वाचा?
- Cotton News: तुम्हालाही तुमच्या कापसाला मिळवायचा 8110 रुपयाचा हमीभाव? तर ‘हे’ काम करा…
- Investment Scheme: 5 लाखाची गुंतवणूक मिळवून देईल तुम्हाला 15 लाख! वाचा संपूर्ण माहिती
- NSC Scheme: कसे मिळेल 5 वर्षात 5 लाख रुपये व्याज? समजून घ्या संपूर्ण गणित