अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप यांच्यावर खोटे आरोप केले, तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मनपातील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नगरसेवक संपत बारस्कर यांनी शुक्रवारी शिवसेनेला दिला.
मनपातील बूटफेक प्रकरणावरून सेना व राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. शुक्रवारी सेनेने पत्रकार परिषद घेऊन आमदार जगताप यांच्यावर टीका केली. सायंकाळी राष्ट्रवादीचे गटनेते बारस्कर यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले.

बारस्कर यांनी म्हटले आहे, राजकीय फायद्यासाठी कोण कायदा हातात घेताे, हे नगरकरांना माहिती आहे. मनपातील घटना व झालेली मारहाण तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केली. यातून शिवसेना व त्यांचे नेत्यांचा सुसंस्कृतपणा दिसला.
गाडे असो की फुलसौंदर, ते पराभवाने वैफल्यग्रस्त झाले आहेत. लोंढेंचे तर सामाजिक कार्य नगरला माहीत आहे. मनपा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला कसा धडा दिला हे लपून राहिलेले नाही.
आम्ही केलेली आंदोलने प्रतीकात्मक आहेत. तरुणांना भडकावून कायदा हातात घ्यायचे तुम्ही शिकवत आहात. पोलिस सर्व बाबींची पडताळी करूनच गुन्हे दाखल करतात.
आपण म्हटल्याप्रमाणे खोटा गुन्हा, जर आमदारांनी दाखल करायला सांगितला असेल, तर पुरावे सादर करावेत. विनाकारण जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटे आरोप करू नयेत, असे पत्रकात म्हटले आहे.
- पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत योजनांचे व्याजदर जाहीर ! ‘ही’ योजना देते सर्वाधिक व्याज
- सॅमसंगचा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना दणका ! या स्मार्टफोनच्या किमतीत झाली मोठी वाढ, कोणाच बजेट बिघडणार
- प्रतिक्षा संपली ! अखेर Mahindra XUV 7XO लाँच, कसे आहेत फिचर्स आणि किंमत?
- कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! केंद्राचा एक निर्णय अन् 2 दिवसात बाजारभाव 400 रुपयांनी वाढले
- देशभरातील बँका जानेवारी महिन्यातील ‘हे’ तीन दिवस सलग बंद राहणार ! कर्मचाऱ्यांनी पुकारला देशव्यापी संप , मागणी काय?











