मेव्हाण्यांणीच केला ‘त्या’ तरुणाचा खून

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर : वडझरी खुर्द येथील दगड खाणीत खून करुन टाकलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आणि खुनाची उकल करण्यात पोलिसांना तीन दिवसांनंतर यश आले. दोघा मेव्हण्यांनीच खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना अटक केली.

सुभाष शांताराम काळे (३५, मालुंजकर चौफुली, सुकेवाडी रोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सख्खा मेव्हणा अमर शिवाजी हासे (२०) आणि चुलत मेव्हणा राहुल रावसाहेब हासे (२३, दोघे राजापूर) अशी आरोपींची नावे आहेत.

सुभाषला तोंडाचा कॅन्सर आणि दारूचे व्यसन होते. तो पत्नीला त्रास देत असे. याच कारणावरुन ती त्याच्याकडे नांदत नव्हती.

सुभाष सासरवाडीला जाऊन रस्त्यात येता-जाता तिला त्रास देत असे. याच कारणावरुन आरोपींनी सुभाषला मद्यधुंद अवस्थेत २९ एप्रिलला मोटारसायकलीवर बसवून रात्री खाणीजवळ आणले.

तेथे त्यांनी डोक्यात दगड टाकून त्याचा खून केला. मृतदेह खाणीत टाकून ते पसार झाले.

पोलिस उपअधीक्षक अशोक थाेरात यांनी मृताच्या नातेवाईकांना बोलावून ओळख पटवली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment