Kapus Bajarbhav : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी यंदाचा हंगाम मोठा निराशा जनक ठरत आहे. खरं पाहता गेल्यावर्षी कापसाला चांगला विक्रमी बाजारभाव मिळाला होता. यामुळे यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली. मात्र यावर्षी कापसाचे बाजार भाव दबावात पाहायला मिळत आहे. यावर्षी मुहूर्ताच्या कापसाला चांगला बाजार भाव मिळाला होता. संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात कापसाला तब्बल 11 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला होता.
मात्र तदनंतर कापसाच्या बाजारभावात घसरण झाली. सध्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते 9 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. दरम्यान दोन तारखेला कापसाला आठ हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला होता. तर तीन तारखेला कापसाच्या बाजार भाव जवळपास एक हजार रुपयांची घसरण झाले आणि कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढाच बाजार भाव मिळाला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधव संकटात सापडत असल्याचे चित्र आहे.
शेतकरी बांधवांच्या मते कापूस पिकासाठी उत्पादन खर्च या वर्षी अधिक झाला आहे. अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला असल्याने यावर्षी कीटकनाशकांवर अधिक खर्च करावा लागला आहे. शिवाय अधिक उत्पादन खर्च करून देखील उत्पादन मात्र कमीच मिळणार आहे.
उत्पादन कमी आणि त्यातच कापसाला मिळत असलेला हा कवडीमोल बाजार भाव यामुळे कापूस पीक शेतकरी बांधवांसाठी तोट्याचे ठरत आहे. अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकरी बांधव आता शेती कशी करायची हा प्रश्न उपस्थित करू लागला आहे. मित्रांनो तीन तारखेला राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस पिकाला काय बाजार भाव मिळाला होता याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
वरोरा माढेली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये कापसाची 20 क्विंटल आवक झाली. 3 तारखेला झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव सात हजार 750 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये 3 तारखेला 55 क्विंटल मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून आठ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला होता. तसेच सर्वसाधारण बाजार भाव आठ हजार 100 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला होता.