Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना या हंगामात मोठ्या निराशाचा सामना करावा लागत आहे. मित्रांनो खरं पाहता गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला उच्चांकी बाजार भाव मिळाला होता. यामुळे यावर्षी देखील सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती.
मात्र आता सोयाबीन हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटत आला आहे. तरीदेखील सोयाबीनच्या बाजारभावात अपेक्षित अशी वाढ होत नसल्याने शेतकरी बांधवांचा भ्रमनिरास झाला आहे. दरम्यान, केंद्र शासनाने सोयाबीन आणि सोयाबीन तेलावरील असलेली स्टॉक लिमिट काढून घेतली आहे.
यामुळे सोयाबीन बाजारात सकारात्मक परिणाम होणार असून सोयाबीन दरात वाढ होणार आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे सोयाबीन बाजारभावात किंचित वाढ नमूद केली जात आहे. खरं पाहता सध्या राज्यात सोयाबीनला सरासरी 5300 प्रतिक्विंटल पासून ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे.
दरम्यान, बियाण्यासाठी उपयुक्त असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक बाजार भाव नमूद केला जात आहे. जानकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार बिजवाईसाठी वापरल्या जाणाऱ्या सोयाबीनला सध्या राज्यात सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. मित्रांनो खरं पाहता राज्यात सध्या रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधव पैशांची उभारणी करत आहे.
या परिस्थितीत शेतकरी बांधव शेतमाल विक्रीवर अधिक भर देत आहे. सोयाबीन विक्रीसाठी देखील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात पुढे सरसावला आहे. दरम्यान व्यापारी लोकांकडून बिजवाई साठी उपयुक्त सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.
व्यापाऱ्यांचा जेएस 9305 या बीजवाईसाठी उपयुक्त असलेल्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाच्या सोयाबीन खरेदीकडे अधिक रस आहे. मीडिया रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार मंगरूळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीजवाई साठी वापरल्या जाणाऱ्या सोयाबीनला तब्बल सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मिळाला आहे.