नगर: महापालिकेतील शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह २० जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
त्यापैकी नगरसेवक अशोक बडे व मदन आढाव यांना पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींनी मात्र न्यायालयाकडे जामिनासाठी विनंती अर्ज सादर केला असून त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

बोल्हेगाव उपनगरातील रस्त्याचे काम बंद पडल्याच्या निषेधार्थ शिवसेना उपनेते अनिल राठोड, नगरसेवक अशोक बडे, आकाश कातोरे मदन आढाव, नगरसेविका कमल सप्रे, रिता भाकरे, दत्तात्रय सप्रे आदींनी नागरिकांसह आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या कार्यालयात ठिय्या दिला होता.
यावेळी संतप्त कार्यकत्यांनी सोनटक्के यांना शिवीगाळ व दमदाटी करत बूट फेकून मारला होता. याप्रकरणी सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी राठोड यांच्यासह २० जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला होता.
बूट फेकून मारणारा आरोपी मदन आढाव याला त्याच रात्री अटक करण्यात आली. नंतर नगरसेवक अशोक बडे यांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली.
इतर फरार आरोपींनी मात्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज सादर केला असून त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. राठोड यांनी कार्यकत्यांना चिथावणी दिली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
त्यांना चांगली भाषा समजत नाही, त्यांना शिवसेना स्टाईल दाखवा, अशी चिथावणी राठोड यांनी दिली होती.
त्यानंतर आढाव याने पायातील बूट काढत सोनटक्के यांना फेकून मारला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
- स्पोर्टी डिझाइन आणि पॉवरफुल इंजिन! नवीन Kawasaki Ninja 650 भारतात लाँच;किंमत आणि वैशिष्ट्ये ऐकून व्हाल खुश
- Indias EV Market : भारतीयांना ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारने लावलं वेड, एका महिन्यात रेकॉर्डब्रेक विक्री; ऑटो बाजारात बादशाह ठरलेली ही कार कोणती?
- ह्युंदाई अल्काझारला टक्कर देण्यास मारुती सज्ज; Grand Vitara 7-Seater चे रेंडर झाले लीक, पाहा किंमत काय असणार?
- हापुस आंब्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण ! आता डझनभर आंबे मिळणार फक्त ‘इतक्या’ रुपयात ! वाचा सविस्तर
- Ahilyanagar Politics : ॲड.प्रताप ढाकणे करणार भाजपमध्ये प्रवेश ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या वाढत्या जवळकीमुळे राजकीय चर्चांना उधाण