Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता या हंगामात सोयाबीन दर फार दबावात आहेत. मात्र आता सोयाबीन दरात वाढ झाली आहे. केंद्र शासनाने सोयाबीन आणि सोयालेलवरील स्टॉक लिमिट काढून घेतली असल्याने सोयाबीन बाजारभावात वाढ झाली आहे. आज देखील राज्यात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाली असून कमाल बाजार भाव 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत येऊन ठेवला आहे.
शेतकरी बांधवांना येत्या काही दिवसात सोयाबीन बाजारभावात अजून वाढ होण्याची आशा आहे. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोज सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाची चर्चा करणार आहोत.
लासलगाव विंचुर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या बाजार समितीमध्ये आज 3350 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5700 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५६०० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- माजलगाव एपीएमसीमध्ये आज 5481 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4200 प्रतिक्विंटल एवढा किमान आणि 5592 एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5300 रुपये नमूद झाला आहे.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– मित्रांनो सोयाबीन लिलावासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 1600 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5400 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5,300 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ अर्थातच राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 274 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4536 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5626 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५४०० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोलापूर एपीएमसीमध्ये आज सर्वाधिक कमाल बाजारभावाची नोंद झाली आहे. एपीएमसीमध्ये आज झालेल्या लिलावात सोयाबीनला 4 हजार 5 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 6000 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5650 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :– सोयाबीन लिलावासाठी विशेष प्रसिद्ध अमरावती एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 18606 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5341 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5170 रुपये प्रतिक्विंटल नमूद झाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर मध्ये आज 6340 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4400 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5490 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5,150 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– कोपरगाव एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 1221 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5657 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 555 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसी मध्ये आज 19 हजार 333 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4952 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5811 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5500 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- जालना एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची सर्वाधिक आवक नमूद करण्यात आली. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 19,433 क्विंटल एवढी उच्चांकी आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 3900 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5700 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5150 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज 7513 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आजच झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4400 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5490 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 5200 प्रतिकूल नमूद करण्यात आला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला सोलापूर बाजार समिती प्रमाणेच विक्रमी कमाल बाजारभाव मिळाला आहे. या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनचे 3865 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4800 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5400 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.