शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ! आजपासून ‘ही’ बँक शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करणार ; वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:
agriculture loan

Agriculture Loan : आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या हीं शेती व्यवसायावर आधारित आहे. खरं पाहता शेती करताना शेतकरी बांधवांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शेती करण्यासाठी शेतकरी बांधवांना भांडवलाची आवश्यकता असते.

मात्र अनेकदा शेतकऱ्यांकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याने त्यांना शेती करण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांना खूपच तोकडे उत्पन्न मिळते. अशा परिस्थितीत कर्ज फेडणे तर सोडाच शेतकरी बांधवांना स्वतःच घर चालवणे देखील मोठे मुश्किल बनते. यामुळे शेतकरी बांधवाच्या डोक्यावर कायमच कर्ज राहते. परिणामी देशात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे.

महाराष्ट्रात तर सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. दरम्यान आता शेतकरी बांधवांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार आज पासून नाशिक जिल्हा बँक शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या अडचणीत अजूनच वाढ होणार आहे. मित्रांनो खरं पाहता नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी बांधव नाशिक जिल्हा बँकेतून कर्ज घेत असतात. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक निश्चितच चिंताजनक बातमी आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की नाशिक जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या परंतु कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकरी बांधवांकडून आता कर्जाची वसुली केली जाणार आहे. यासाठी नासिक जिल्हा बँकेकडून एक विशेष मोहीम हाती घेतली गेली आहे. मित्रांनो खरं पाहता नाशिक जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती ही डबघाईला आली आहे. अशा परिस्थितीत बँकेला सावरण्यासाठी कर्जाची वसुली करणे अतिशय आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

यामुळे बँकेकडून आजपासून कर्ज वसुलीची मोहीम राबवली जात आहे. बँकेची आर्थिक पत वाढवण्यासाठी बँक प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली केली जात असल्याचे सांगितले गेले आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, नासिक जिल्हा बँकेची 2156 कोटी रुपयांची रक्कम वसुलीची बाकी आहे. विशेष म्हणजे यापैकी तब्बल 1452 कोटी रुपये एवढी रक्कम जुनी थकबाकी आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा बँकेकडून आता कर्जाची वसुली केली जाणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान नाशिक जिल्हा बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांना आता कर्जाची परतफेड करणे अनिवार्य आहे. निश्चितच शेतकरी बांधवांनी कर्ज परतफेडी बाबत सकारात्मक विचार करणे अनिवार्य झाले आहे. दरम्यान शेतकरी बांधवांच्या मते यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि नंतर परतीच्या पावसामुळे हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

यामुळे हाती अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळणार आहे. अशा परिस्थितीत बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान कर्ज वसुलीबाबत नाशिक जिल्हा बँक कितपत ताठर भूमिका घेते हे बघण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe