Mumbai Breaking : मायानगरी मुंबईतली वाहतूक कोंडी होणार दूर ; वरळी नाक्यावर साकारला जाणार नवीन ब्रिज, डिटेल्स वाचा

Published on -

Mumbai Breaking : मित्रांनो मुंबई वासियांसाठी एक अतिशय कामाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.  बृहनमुंबई महानगरपालिकाच्या माध्यमातून मुंबई शहरातील वरळी नाक्याला एक ब्रिजचे काम केले जाणार आहे. या ब्रिजच्या माध्यमातून वरळी नाक्यावरील गर्दी, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) वरळी येथील डॉ एलिजा मोसेस रोड आणि अॅनी बेझंट रोड दरम्यान एक नवीन वाहन पूल बांधणार आहे. जाणकार लोकांच्या मते या ब्रिजमुळे मायानगरी मुंबई शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

नेहरू सायन्स सेंटरला लागून असलेल्या नाल्यावर हा सदर पूल बांधण्यात येणार आहे. बीएमसी डॉ एलिजा मोसेस रोडवरील नेहरू सायन्स सेंटर आणि डॉ एनी बेझंट रोडवरील नेहरू तारांगण यांना जोडणारा पादचारी अंडरपास देखील बांधणार आहे.

सदर नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या वाहन पुलाची स्थिती:

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सदर पुलाबाबत ऑक्टोबरमध्ये वर्क ऑर्डर देण्यात आले होते.

या विकसित होणाऱ्या पुलाच्या आढाव्यासाठी बीएमसीची पाहणी 2 नोव्हेंबर रोजी झाली.

सदर वाहन पुलाचे आता कंत्राटदार काम सुरू करणार आहेत.

मित्रांनो, हाती आलेल्या माहितीनुसार वरळी नाका परिसरातील होणारी गर्दी कमी करण्यासाठी बीएमसी कडून बांधण्यात येणाऱ्या या पुलासाठी अंदाजे 280 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

कसा राहणार आहे हा पुल

सदर पूल हा दुतर्फा म्हणजे 2-वे राहणार आहे.

या पुलाची सुमारे 570 मीटर लांबी राहणार आहे.

संपूर्ण पूल नाल्याच्या वर बांधला जाणार आहे.

500-मीटर-लांब पादचारी अंडरपास देखील राहणार आहे.

असा होणार याचा फायदा 

वरळी नाका, जो लोअर परळ, वरळी आणि प्रभादेवी, महालक्ष्मी आणि भायखळा यांना जोडणारा सहा रस्त्यांचा जंक्शन आहे तेथील गर्दी कमी करण्यासाठी म्हणजे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सदर पूल बांधला जाणार आहे.

हे रस्ते वरळी आणि प्रभादेवीला जोडणारा डॉ. अॅनी बेझंट रोड, लोअर परळकडे जाणारा जीएम भोसले रोड आणि गणपतराव कदम रोड आणि महालक्ष्मीकडे जाणारा डॉ. एलिजा मोसेस रोड आहेत.

नेहरू तारांगण आणि नेहरू सायन्स सेंटर दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना वरळी नाका रस्त्यांवरून जावे लागते जे की हेवी ट्रॅफिक एरिया आहे. या नवीन शॉर्टकटमुळे वरळी नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. पादचारी अंडरपास पर्यटक आणि अभ्यागतांसाठी रस्ता सुरक्षा सुधारण्यास मदत करेल, ज्यापैकी बरेच जण शाळकरी मुले किंवा लहान मुले असलेली कुटुंबे आहेत.

अधिकारी लोकांनी सांगितलं की…

ब्रिज डिपार्टमेंट मधील एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, “BMC ने ऑक्टोबरच्या मध्यात पुलाच्या कामाचे आदेश जारी केले आणि आम्ही बुधवारी जागेची पाहणी केली आहे. कंत्राटदाराला आता तातडीने काम सुरू करावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News