Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांबाबत हीं एक महत्वाची बातमी आहे. मित्रांनो खरं पाहता या दोन तालुक्यात बहुतांशी आधीच्या वाडीचे किंवा पाड्याचे महसूल गावात रूपांतर झाले आहे. म्हणजेच या दोन तालुक्यात नव्याने महसूल गावांची निर्मिती झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील या दोन महत्त्वाच्या तालुक्यात नव्याने विकसित झालेल्या महसूल गावांमध्ये मात्र अद्याप पोलीस पाटीलची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
मित्रांनो खरं पाहता महसूल गावामध्ये पोलीस पाटील हे पद अति महत्त्वाचे असते. नैसर्गिक आपत्ती बाबत शासनास अवगत करण्यासाठी, गावातील शांतता कायम राखण्यासाठी पोलीस यंत्रणेत मदत म्हणून, तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांच्या अधिपत्याखाली दिलेल्या कामकाजासाठी प्रत्येक गावात पोलीस पाटील असणे अनिवार्य असते. अशा परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील या दोन महत्त्वाच्या तालुक्यात नव्याने विकसित झालेल्या जवळपास 58 महसूल गावात पोलीस पाटील पद भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, कर्जत तालुक्यातील एकूण 118 गावांपैकी 7 गावे वगळता एकूण 111 गावांमध्ये पोलीस पाटील पदांची गरज असते. सात गावांमध्ये चार नगरपंचायत हद्दीमधील गाव आहेत तर तीन गावांना पोलीस चौकी उपलब्ध आहेत. यामुळे या सदर सात गावांना पोलीस पाटील पदाची आवश्यकता नाही. मात्र उर्वरित 111 गावांमध्ये पोलीस पाटील हे अति महत्त्वाची भूमिका बजावणारे आहेत. मात्र या 111 गावांमध्ये सद्यस्थितीत 78 गावांना पोलीस पाटील लाभले आहेत तर उर्वरित 33 गावांमध्ये पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे.
जामखेड तालुक्या बाबत विचार केला असता जामखेडमध्ये एकूण 87 गावे आहेत. जामखेड तालुक्यातील नगरपंचायतीच्या हद्दीत एकूण सात गावे आणि तीन गावांना पोलीस चौकी उपलब्ध आहे. या परिस्थितीत जामखेड तालुक्यातील या दहा गावांना पोलीस पाटील ची आवश्यकता नसते. मात्र उर्वरित 77 गावांना पोलीस पाटील आवश्यक आहे. सद्यस्थितीत 52 गावांना पोलीस पाटील लागले आहेत. तर 25 गावांना पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
दरम्यान कर्जत आणि जामखेड दोन तालुक्यात तयार झालेल्या नवीन महसूल गावात पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी डॉक्टर अजित थोरबोले, उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय दंडाधिकारी कर्जत यांनी आदेश काढले आहेत.