अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील निघोज येथील चारही संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून हा आनंद साजरा केला.
दोन दिवसांपूर्वी चार वर्षांच्या मुलीला सर्दी, ताप, खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्याने या कुटुंबाने मुलीला खासगी डॉक्टरकडे नेले. त्यांनी सरकारी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला.
ही बातमी निघोजमध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली. सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. लगेच या कुटुंबातील चारही सदस्यांना नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल नेण्यात आले.
त्यांचे घशाचे स्राव तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले. त्यांचा अहवाल गुरूवारी आला. हे चारही जण निगेटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने निघोजकर मोठ्या संकटातून बाहेर पडले.
तहसीलदार ज्योती देवरे यांची सर्व व्यवहार बंद राहणार असून कुणीही घरातून बाहेर पडू नये, अशी सूचना करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने अत्यावश्यक सेवासुद्धा तातडीने बंद करण्यात आली होती.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com