शिवभोजन थाळी मिळणार घरपोहोच !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशात व राज्यात कोरोनाच्या उद्रेकाने हाहाकार पसरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यात या संकटकाळात प्रभावी उपाययोजना करत आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी ही बिकट परिस्थिती कौशल्याने हाताळली आहे.

शिवसैनिकांना गरजुंना मदत करण्यासाठी प्रोत्साहित केले. लाॅकडाउनमुळे कोणीही उपाशी राहू नये, याचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तालुका स्तरावरही आता पाच रुपये नाममात्र दरात शिवभोजन थाळी सुरू केली असून

पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खोलेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने येथील पाथर्डीतील जुने बसस्थानक आवारातील सातपुते कॉम्लेक्स येथे शिव भोजन थाळीचा प्रारंभ करत आहोत.

या मुळे हातावर पोट असलेले गरजुंना या लाॅकडाउनच्या काळात आधार मिळेल. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये. यासाठी मागेल त्याला पार्सलद्वारे घरपोच सेवा दिली जाईल.

सध्याच्या भिषण परिस्थितीत लाॅकडाउन असेपर्यंत शिवभोजन थाळीसाठी संख्येचे कुठलेही बंधन नाही, अशी माहिती शिवसेना संघटक भगवान दराडे यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment