देशभरात कोरोना व्हायरसमुळे रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे देशात 169 लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतात कोरोना तिसऱ्या टप्प्यात आहे की नाही, यासाठी ICMR ने हे पाऊल उचलले होते. याबाबत ICMR ने दिलेल्या अहवालात आता असे सूचित केले गेले आहे की देशातील काही भागांमध्ये सामुदायिक प्रसारण होण्यास सुरूवात झाली आहे. याचा अर्थ भारतात तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.
फेब्रुवारी ते 2 एप्रिल या काळात ICMR ने कोरोना विषाणूच्या 5911 संशयित रुग्णांची गंभीर तीव्र श्वसन आजार (SARI) चाचणी केली. यांपैकी 104 म्हणजे 1.8 टक्के रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते. देशातील 15 राज्यांमधील 36 शहरांमध्ये या चाचण्या घेण्यात आल्या.
धक्कादायक म्हणजे ज्या राज्यांमध्ये SARI चे एक टक्क्यांहून अधिक प्रकरणे आहेत त्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात 553 पैकी 21 प्रकरणे म्हणजे 3.8% , गुजरातमध्ये 792 पैकी 12 केस म्हणजे 1.6%, तामिळनाडू 577 पैकी 5 म्हणजेच 0.9%, आणि केरळमध्ये 502 प्रकरणातून 1 केस म्हणजेच 0.2 टक्के कम्युनिटी ट्रान्समिशनची शक्यता आहे.
देशातील कोरोना बाधितांची संख्या लवकरच 6 हजारांचा टप्पा ओलांडणार आहे. मागील 24 तासांत कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे 591 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर 20 लोकांचा मृत्यू झाला आहे.