Surat Chennai Greenfield Expressway : भारतमाला परियोजने अंतर्गत संपूर्ण देशात केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गांची निर्मिती प्रगतीपथावर आहे. यामध्ये समृद्धी महामार्ग तसेच सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे चा देखील समावेश आहे.
दरम्यान आता नासिक अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे बाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आला आहे. या महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात सध्या सुरत चेन्नई महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन सुरू आहे. नाशिक तालुक्यात याआधीच भूसंपादन सुरू झाले असून आता दिंडोरी तालुक्यात भूसंपादनाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. दिंडोरी तालुक्यात हा महामार्ग 52 किलोमीटर एवढा राहणार असून यासाठी 174 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे.
जिल्ह्यातून एकूण 996 हेक्टर एवढी जमीन भूसंपादित केली जाणार आहे. नासिक तालुक्यातील 83 हेक्टर भूसंपादन प्रक्रियेसाठी याआधी सुरुवात झाली असून आता 174 हेक्टर शेतजमीन दिंडोरी तालुक्यात भूसंपादित होणार आहे.
हा महामार्ग अहमदनगर, सोलापूर तसेच नाशिक जिल्ह्यातील विकासासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या महामार्गामुळे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा उद्योग जगताचा आणि पर्यटनक्षत्राचा कायापलट होणार असल्याचा दावा केला जातो. हा महामार्ग जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर या तालुक्यातून जाणार आहे.
या महामार्गासाठी नाशिकमध्ये जमिनीचे भूसंपादन केले जात असून पेठ आणि सुरगाणा या दोन तालुक्यातील भूसंपादनासाठी पर्यावरण मंत्रालयाने ना हरकत दाखला दिला नसल्याचे नुकतेच काही दिवसांपूर्वी समोर आले आहे. यामुळे या दोन तालुक्यात भूसंपादन प्रक्रियेबाबत नेमका काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच आता नाशिक जिल्ह्यात या महामार्गाच्या भूसंपादनाच्या कामाला वेग आला आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, दिंडोरी तालुक्यात ज्या शेतकरी बांधवांच्या महामार्गात जमिनी जाणार आहेत अशा शेतकरी बांधवांना नोटीसा बचावल्या होत्या आणि आक्षेप नोंदवण्यासाठी काही कालावधी दिला होता. कालावधीत तालुक्यातून एकूण 603 शेतकऱ्यांनी आक्षेप घेतले.
मात्र सदर ऑब्जेक्शन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निराकरण करण्यात आले आहे. यामुळे आता दिंडोरी तालुक्यात भूसंपादन सुरू झाले आहे. तालुक्यातील आंबेगण, ढकांबे, धाऊर, इंदोरे, जांबुटके, नाळेगाव, पिंपळनारे, रामशेज, रासेगाव, वरवंडी, सिवनई, उमराळे या गावांमध्ये आता भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे.