अहमदनगर :- लहान मुलांचा गाडीला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून शहरातील वंजारगल्ली भागात शुक्रवारी दुपारी युवकांंच्या दोन गटांत धुमश्चक्री झाली.वाद वाढत गेल्याने संतप्त जमावाने दोन दुचाक्या जाळल्या. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दंगलीत सहा जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. वंजारगल्ली भागात दुपारच्या सुमाराला लहान मुलांचा गाडीचा धक्का लागला. त्या किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद झाला.त्यामुळे तेथे गर्दी गोळा झाली. जमाव वाढल्यानंतर दोन गटात हाणामारीला सुरुवात झाली. काहीजणांनी दगडफेकही केली. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाळा.